Wikipedia

Search results

Thursday, 1 March 2018


                   पावनखिंडीची लढाई

            पावनखिंडीची लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्त्वाची लढाई मानली जाते. ही लढाई १३ जुलै १६६० रोजी विशालगड जवळील पावनखिंड (घोडखिंड) येथे झाली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून छत्रपती शिवाजी महाराज विशालगडाकडे कूच करत होते पर्ंतु आदिलशाही सेनेला त्याचा सुगावा लागला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे आदिलशाही सेनेचा पाठलाग चालू झाला. जेव्हा शिवाजी व त्यांचे साथीदार घोडखिंडीत पोहोचले, त्यावेळेस बाजी प्रभू देशपांडे या सरदाराने शिवाजीं महाराजांना विनंती केली की महाराज आपन पुढे गडावर जावे व जोवर आपन गडावर पोचत नाहीत तोवर बाजी ही खिंड लढवत राहील व शत्रूला तिथेच रोखून धरतील. एक एक मावळ्याने ५५-६० मुगल कापून काढले, अशी लढाई युद्धशास्त्रात लास्ट स्टँड मानली जाते.
    आदिलशाही फौजेचे नेतृत्व सिद्दी जौहरकडे होते, त्याला सिद्दी मसूद व फाजल खान (अफझलखानाचा मुलगा) यांची साथ होती. जौहरची एकूण फौज १५,००० ची होती तर छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त ६०० मावळे होते. लढाईच्या दिवशी रात्री छत्रपती शिवाजी महाराजांनी पौर्णिमेच्या रात्री गडावरून उतरून वेढा तोडला व विशालगडाकडे कूच केले. ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासारख्याच दिसणाऱ्या शिवा काशीद नावाच्या न्हाव्याला शिवाजी म्हणून जौहरकडे बोलणी करण्यासाठी पाठवले होते. या भेटी दरम्यानच्या काळातच छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे यांच्यासहित पन्हाळ्यावरून विशालगडाकडे कूच केले. जेव्हा जौहरला छत्रपती शिवाजी महाराज विशालगडाकडे निघुन गेले याचा सुगावा लागला तेव्हा त्याने सिद्दी मसूदला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. काही वेळाने छत्रपती शिवाजी महाराज व साथीदार घोडखिंडीत पोहोचले तेव्हा पाठलाग करणारे मसूदचे सैनिक जवळच आहेत याची त्यांना जाणीव झाली व काही वेळातच ते गाठतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांना व इतरांना पकडतील असा अंदाज होता. घोडखिंडीत अतिशय चिंचोळी वाट होती व एकावेळेस एक-दोन जणच रांगेतून जातील एवढी वाट होती. बाजीप्रभूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्थिती समजावून विशालगडावर प्रस्थान करायचा विनंती केली व जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावर पोहोचून तीन वेळा तोफांनी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असा विश्वास महाराजांना दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० मावळया सहित पुढे विशाळगडावर प्रयाण केले.
            सिद्दी जौहरचे १५००० सैनीक खिंडींच्या बाहेर आणि बाजीप्रभु कडे फ़क्त ३०० मावळे होते. परंतू बाजीप्रभुंनी संपुर्ण आत्मविश्वासाने रणनीती आखली व खिंड ७ ते ८ तास लढत ठेवली. ध्येय निश्चीत होत की जो पर्यंत शिवाजी महाराज विशालगडावर पोहोचत नाही तो पर्यंत खिंड लढत ठेवायची. सर्व मावळे रक्तबांभाळ झाले असतांनाही सिद्दी जौहरच्या सैनीकांची मुंडकी छाटत होती. शेवटी विशालगडावरुन तोफांचा आवाज आला आणी सर्व मावळ्यांनी आपला विजय झाला आपली फतेह झाली म्हनुण एकच गर्जना केली हर हर महादेव. या लाढाई मध्ये बाजीप्रभु सोबतच सर्व ३०० मावळ्यांना विरमरण आले.
     इतीहासातील ही एकमेव लढाई असावी की १५००० सैन्यांनाचा ३०० मावळ्यांनी ७ ते ८ तास सामना करुन विजय फ़ते केला. ईतीहासातील या घटने वरुन लक्षात येइल की शिवाजी महाराजांसाठी मावळे आपल्या प्राणाची आहुती द्यायला नेहमी तयार असत. स्वराज्या साठी आपल्या प्राणाची आहुती देनार्या बाजीप्रभु व सर्व ३०० मावळ्यांना माझा कोटी कोटी मुजरा....

                                              शिवभक्त शिवव्याख्याता सचिन गायागोले
                                  जय शिवराय जय जिजाउ



Like & Comments 

Record Knowledge Book:                 विश्व वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज...

Record Knowledge Book:                 विश्व वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज...:                  विश्व वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज                  आणि आजच्या समाजाची मानसिकता                मित्रानो शिवजयंतीची तयार...

Wednesday, 28 February 2018

                           शूर महापराक्रमी येसाजी कंक
 जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज  हे राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयासाठी गेले होते  त्यावेळी येसाजी कंक सुद्धा सोबत होते.  महाराजांनी आदिलशाही संपवण्यासाठी कुतुबशहाशी हातमिळवणी केली होती. कुतुबशहाने भेटीच्या वेळी विचारले की "मराठा सैन्यामधे हत्ती कां नसतात..?" त्याबदल्यात शिवरायांनी उत्तर दिले होते की "स्वराज्याच्या सैन्यातील प्रत्येक मावळा हा हत्तीवर भारी पडू शकतो."तेव्हा येसाजी कंक यांनी आपल्या राजाचा शब्द खरा करून दाखवण्यासाठी म्हणून आखाड्यात उडी घेतली. त्यांनी हत्तीशी एकट्याने झुंज दिली व हत्तीस पळवून लावले.
                                           शिवभक्त शिवव्याख्याता सचिन गायागोले
                                                जय शिवराय जय जिजाउ 


Like  & Comment

Sunday, 18 February 2018

                विश्व वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज 
                आणि आजच्या समाजाची मानसिकता

              मित्रानो शिवजयंतीची तयारी सर्वत्र सुरु आहे, आनंद वाटतो कि शिवाजी महाराजांनी ३५० वर्षा पूर्वी निर्माण केलेल स्वराज्य आज आपण आठवणीत ठेऊन आहे. शिवाजी महाराजांचं कार्य येवढ विशाल आणि अगाध आहे कि ते आपण कितीही वर्ष झाली तरीही विसरू नाही शकत.
            परंतु शिवजयंती म्हणजे फक्त ढोल ताशे किव्हा डॉल्बी डीजे वाजवणे नाही तर शिवरायाना समजून घेणे व त्या साठी शिवाजी महाराजांच्या याशोगाथांची महाराजांच्या इतिहासाची पुस्तके वाचणे महत्वाचे आहे................................. 
                                                        शिवभक्त शिवव्याख्याता सचिन गायागोले 

रायगड एक्सप्रेस

                    पावनखिंडीची लढाई             पावनखिंडीची लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्त्वाची लढाई मानली जाते. ही लढाई १३ जुलै १६...

Sach bolta hai